तो...

kavita

Cover artwork for तो...
POETRY

आज किहीसा तो लवकर घरी आला,
त्याच समुद्र किनारी जायला
जिथे तो काही वर्षापुर्वी जायचा
तिच्या आठवणींना उजाला देण्यासाठी.....

माञ नेहमीसारखा त्याचा हात
आज रिकामा नव्हता,
हातात होती सिगारेट
आणि बेधुंद हवेत होता घुर......

लाटांच्या आवाजातही एक
अनामिक शांतता होती,
ती शांतता त्याच्या काळजाचे
तुकडे झाल्याचा भास देत होती.....

कानात घुमनारे तिचे शब्द
आज अबोल झाले होते,
त्याचे डोळे भरुन आणि
मन गहिवरुन आलं होतं.....

का कुणास ठावुक तिच्या आठवणींमध्ये तो मंञमुग्ध झाला होता,
तिला शोधण्यासाठी तो समुद्रकिनारी आला होता....

वाळुच्या किल्ल्यात शिंपल्यासारखे क्षण
साठवण्याचा प्रयत्न तो करत होता,
माञ लाटांच्या स्पर्शाने ते क्षण वाहुन
जात असताना तो धडपडत होता....

काहीसा वेंधाळलेला तो पाण्यात
आपले प्रतिबिंब पाहात होता,
आणि ती असल्याची जाणीव
स्वतःलाच करुन देत होता....

माञ अपघातात गेलेली ती
परत कधीच येणार नाही,
या विचाराने तो पुन्हा एकता
मन भरुन रडत होता....

डोळ्यात असलेले ते खारट अश्रु तिच्यावर असलेल्या अफाट प्रेमाची जाणीव तो
स्वतःलाच करुन देत होता....

-तेजल काटकर


#Poetry #QuietVerses #MidnightMusings #WordCraft
Next 3-Minute Read The Night-Watch at the Sluice Gate Read Next Story →
Read smoothly in WritOn
Open App